सह्याद्री मित्र संमेलन बोधचिन्ह
सह्याद्री मित्र संमेलन

पुरस्कार सोहळा व मानकरी

सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांत, संवर्धनात आणि संकटसमयी झोकून देऊन कार्य करणाऱ्या निष्ठावंतांच्या प्रामाणिक कर्तृत्वाचा जाहीर सन्मान.

गौरवशाली परंपरा

पहिल्या वर्षातील मानाचे पुरस्कार

पहिल्या सह्याद्री मित्र संमेलनात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान:

ट्रेकर ऑफ द इयर

श्री. नितीन मोरे

सह्याद्रीच्या दुर्गम वाटांवरील प्रदीर्घ अनुभव व भटकंतीच्या क्षेत्रातील उल्लेखनीय आणि अखंड योगदानाबद्दल गौरव.

वाटाड्या ऑफ द इयर

श्री. कमळू पोकळा

सह्याद्रीच्या कठीण वाटा, स्थानिक परिसर आणि स्थानिक भटकंती परंपरेशी असलेले नाते जपत भटक्यांना मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल सन्मान.

रेस्क्यू टीम ऑफ द इयर

शिवदुर्ग संस्था, लोणावळा

कड्याकपारीत संकटात सापडलेल्या ट्रेकर्स आणि गिर्यारोहकांच्या मदतीसाठी जीवाची बाजी लावून सातत्याने कार्य केल्याबद्दल सर्वोच्च गौरव.

दुर्गसंवर्धन टीम ऑफ द इयर

बा रायगड परिवार

ऐतिहासिक गड-किल्ल्यांचे पावित्र्य राखण्यासाठी आणि संवर्धनासाठी सातत्याने श्रमदान मोहीम राबवल्याबद्दल विशेष सन्मान.

ब्लॉगर ऑफ द इयर

श्री. प्रांजल वाघ

सह्याद्री आणि दुर्गभटकंतीचे अनुभव अत्यंत प्रभावीपणे, माहितीपूर्ण आणि संवेदनशीलपणे मांडणाऱ्या डिजिटल लेखनासाठी गौरव.

फोटोग्राफर ऑफ द इयर

आर्किटेक्ट संग्राम गोवर्धने

सह्याद्रीचे नयनरम्य सौंदर्य, गडकोटांचे स्थापत्य आणि भटकंतीचे क्षण कॅमेऱ्यातून अचूक व प्रभावीपणे टिपल्याबद्दल सन्मान.

मोबाईल फोटोग्राफर

श्री. पृथ्वीराज शिंदे

मोबाईल फोटोग्राफीच्या माध्यमातून सह्याद्रीचे निसर्गसौंदर्य आणि जिवंत क्षण अत्यंत कलात्मकतेने टिपल्याबद्दल गौरव.

विशेष गौरव

निष्ठावंत संस्था व व्यक्तींचा विशेष गौरव

  • महाजन बंधू, नाशिक — गिर्यारोहणातील अतुलनीय योगदान
  • चक्रम हायकर्स, मुंबई — सातत्यपूर्ण भटकंती व नेतृत्व
  • नाशिक क्लाईंबर अँड रेस्क्यू असोसिएशन — बचाव कार्य व आपत्कालीन मदत
"सह्याद्रीसाठी केलेले प्रत्येक प्रामाणिक काम महत्त्वाचे आहे आणि त्याची दखल घेतलीच पाहिजे — हा या विशेष गौरवामागचा विचार."
संमेलनाचा खरा अर्थ

पुरस्कारांपलीकडचं संमेलन

पहिल्या सह्याद्री मित्र संमेलनाची खरी कमाई पुरस्कार किंवा कार्यक्रम नव्हते. खरी कमाई होती — माणसं जोडली जाणं.

एकमेकांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळणं, अनुभवांची देवाणघेवाण होणं आणि सह्याद्रीविषयीची समान आस्था एका व्यासपीठावर येणं.

‘आपण सह्याद्रीत भटकतो; पण सह्याद्रीसाठी आपण काय करतो?’ हा विचार अधिक दृढ झाला.

भटकंतीसोबत निसर्गसंवर्धन, गड-किल्ल्यांविषयी जागरूकता, सुरक्षित भटकंती, स्थानिक समाजाचा सन्मान आणि सह्याद्रीचे जतन या मूल्यांची जपणूक करण्याची गरज अधोरेखित झाली.

माणसं जोडणारे व्यासपीठ

पुरस्कार हे फक्त कौतुकाचे प्रतीक आहेत; खरी शक्ती आहे सह्याद्रीच्या रक्षणासाठी एकत्र आलेल्या हजारो हातांमध्ये!